
स्पेशल हॅण्डलुम एक्स्पोचे उदघाटन
88388
कोल्हापूर ः स्पेशल हॅण्डलुम एक्स्पोचे उद्घाटन करताना महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे. सोबत विजय निमजे, ज्ञानदेव बाभूळकर, नंदकुमार तुळजापुरकर.
स्पेशल हॅण्डलुम एक्स्पोचे उद्घाटन
कोल्हापूर, ता. ११ ः वस्त्रोद्योग विभागाच्या प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळातर्फे आयोजित स्पेशल हॅण्डलुम एक्स्पो २०२३ चे उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते झाले. व्ही. टी. पाटील स्मृती भवनात हे हातमाग कापड प्रदर्शन व विक्री भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन बुधवार (ता. २२) पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
प्रदर्शनात विविध जिल्ह्यातून आलेल्या विणकर कारागिरांनी हातमागावर तयार केलेल्या कापडाची उत्पादने विक्रीस उपलब्ध करून दिली आहेत. त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर शहरात हे प्रदर्शन आयोजित केले असून येथे खरेदी करावी, असे आवाहन डॉ. बलकवडे यांनी केले. प्रदर्शनात विणकर सहकारी संस्थांनी तयार केलेले हातमागाच्या चादरी, टॉवेल, नॅपकीन, सतरंजी, पंचे, बेडशीट, पिलो कव्हर तसेच नैसर्गिक धागा व रेशीम कोशापासून व बांबू बनाना ब्लेडेडे फॅब्रिक्स व साड्या विक्रीस ठेवल्या आहेत. तसेच सहभागी संस्थांकडून २० टक्के सुट जाहीर केली आहे. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक विजय निमजे, प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभूळकर, नंदकुमार तुळजापूरकर उपस्थित होते.