
समिधा प्रतिष्ठान कार्यक्रम
88397
कोल्हापूर : समिधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. अर्चना जाधव. शेजारी अजित ठाणेकर, प्रियांका वाकळे आदी.
शिवकालातील कर्तृत्ववान
स्त्रीशक्तीचा पराक्रम प्रेरणादायी
डॉ. अर्चना जाधव; समिधा प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ‘‘छत्रपती शिवरायांच्या कालखंडात जिजाऊंपासून अनेक कर्तृत्ववान महिला साक्षर, राजनीती धुरंदर आणि रणनितीज्ञ होत्या. त्यांच्या कर्तृत्वामुळेच शिवरायांच्या पश्चातही औरंगजेबाला मराठीशाहीची सत्ता संपवता आली नाही.’’ स्त्रीशक्तीचा हा पराक्रम आजही प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट मत डॉ. अर्चना जाधव यांनी व्यक्त केले. समिधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पोलिस अधिकारी प्रियांका वाकळे अध्यक्षस्थानी होत्या.
जागृती समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा शारदा पाटील आणि ब्राह्मण सभा करवीरच्या संचालिका अनुराधा गोसावी यांचा यावेळी कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान झाला. आदिशक्ती महिला सहकारी औद्योगिक संस्थेचे उद्घाटनही या वेळी झाले. सायली मुनिश्वर यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगितली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर यांनी स्वागत केले. राधिका ठाणेकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. दीपा ठाणेकर, अमृता खाडे-पाटील, रामप्रसाद ठाणेकर, ओंकार गोसावी, शुभंकर गोसावी, ऋतुराज नढाळे यांनी संयोजन केले. दरम्यान, प्रतिष्ठानतर्फे आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली.