गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

८८४०७
कौलगे : ग्रामपंचायत व नाळ फौंडेशनतर्फे झालेल्या रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्या साई महिला बचत गटाला पारितोषिक देताना दत्ता मडकर. शेजारी ग्रामपंचायत व नाळ फौडेंशनचे पदाधिकारी.

कौलगेत महिलांची रस्सीखेच स्पर्धा
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व नाळ फाउंडेशनतर्फे महिलांची रस्सीखेच स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत १२ महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. साई महिला स्वयंसहायता बचत गट, न्यू महालक्ष्मी महिला स्वयंसहायता बचत गट, प्रगती महिला स्वयंसहायत बचत गट यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. त्यांना ३३३३, २२२२, ११११ रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. नामदेव यादव यांनी पंच म्हणून काम पाहिले. गुंगुबाई पन्हाळकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण झाले. यावेळी अरुणा शहापूरकर, उज्वला पाटील, आशा चव्हाण, मंगल माने, शीतल मोरे या एक कन्या मातांचा सत्कार करण्यात आला. सरपंच भाऊसाहेब कांबळे, उपसरपंच संजय पोवार यांच्यासह नाळ फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------
८८४०९
मनोहर कोळसेकर, अनिल सावरे

शिवशाहूच्या अध्यक्षपदी मनोहर कोळसेकर
गडहिंग्लज : येथील शिवशाहू शिक्षक शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. मनोहर कोळसेकर यांची तर उपाध्यक्षपदी अनिल सावरे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. जे. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या निवडी झाल्या. संस्थापक बी. जी. काटे, बाळासाहेब सावंत, एम. एस. कांबळे, डॉ. अण्णासाहेब हरदारे, राजेंद्र खोराटे, संजय केसरकर, महेश चौगुले, उत्तम राऊत, रोशन पाटील, दिलावर वाटंगी, गणपती सावंत, रावसाहेब पडदाळे, तायगोंडा देसाई, ईश्वर नाईक, अंजली पाटील, संगिता पोतदार यांच्यासह सचिव बाळासाहेब शिंदे, रवींद्र कोंडुसकर, नारायण होडगे उपस्थित होते.
-----------------------------
८८४१०
गडहिंग्लज : आर्थिक विकास महामंडळासाठी आर्थिक तरतूद केल्याबद्दल एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करताना गुरव समाजाचे पदाधिकारी.

गुरव समाजातर्फे साखर-पेढे वाटप
गडहिंग्लज : महाराष्ट्र सरकारने संत काशिबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल येथील गडहिंग्लज तालुका गुरव समाजातर्फे दसरा चौकात साखर पेढे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल महाराष्ट्र गुरव समाजाचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनात सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्याची दखल घेत सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मागण्यांसाठी पाठपुरावा केल्यानंतर आमदार विजय शिंदे व जिल्हाध्यक्ष धनाजी गुरव यांचे आभार मानण्यात आले. तालुकाध्यक्ष विठ्ठल गुरव, अनिल गुरव, गुरुप्रसाद गुरव, डी. एम. गुरव, चंद्रकांत गुरव, सुभाष गुरव, मोहन गुरव, दयानंद गुरव, सातलिंग गुरव, निरंजन गुरव, अश्विन गुरव यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
---------------------------------
८८४११
गडहिंग्लज : रोटरी क्लब, लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट व भंडारी फौंडेशनतर्फे घाळी महाविद्यालयाला बेंच वितरण प्रसंगी किशोर लुल्ला, व्यंकटेश देशपांडे, डॉ. मंगलकुमार पाटील, यतीराज भंडारी आदी.

रोटरीकडून घाळी महाविद्यालयाला बेंच
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाला रोटरी क्लब ऑफ अतिग्रे, टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन, नारायणदास दामोदर भंडारी फौंडेशनतर्फे १०० बेंच देण्यात आले. लुल्ला फौंडेशनचे अध्यक्ष किशोर लुल्ला यांच्या हस्ते वितरण झाले. श्री. लुल्ला, रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांची भाषणे झाली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी स्वागत केले. भंडारी फौंडेशनचे विश्‍वस्त यतीराज भंडारी, हिंदुराव संकपाळ, प्रा. अनिल उंदरे, प्रा. अनिल मगर, प्रा. अश्विन गोडघाटे, प्रा. सचिन जानवेकर, प्रा. महेश वंडकर आदी उपस्थित होते. रोटरीचे सहायक प्रांतपाल डॉ. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com