आबिटकर बातमी

आबिटकर बातमी

88429
रस्त्यांची कामे १५ मेपूर्वी पूर्ण करा
मंत्री रवींद्र चव्हाण ः आमदार आबिटकर यांच्या प्रश्‍नावरून बैठक
कोल्हापूर, ता. ११ ः जिल्ह्यातील हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत सुरू असणाऱ्या निपाणी-देवगड व कुर-वाशी रस्त्यांची कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. ही कामे संथ व निकृष्ठ सुरू असल्याची बाब अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित केली होती.
युती शासनाच्या काळात राज्यातील रस्ते विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यात हायब्रीड ॲन्युटी योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात तीन प्रमुख रस्त्यांना समावेश होता. या रस्त्यांची कामे अत्यंत संथ सुरू असून यामुळे नागरीकांना त्रास होत होता. यामुळे कामे लवकरात-लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या रस्तेकामाचा दर्जाबाबत असणारे दोष दूर करणे गरजेचे असल्याची बाब श्री. आबिटकर यांनी निदर्शनास आणून दिली.
याबाबत श्री. चव्हाण म्हणाले, ‘हायब्रीड ॲन्युटीअंतर्गत सुरू असणाऱ्या रस्ते कामाचा दर आठवड्याला माझ्याकडे व सचिव रस्ते व आमदारांना देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सुरू असलेल्या रस्ते कामाचा दर्जा तपासण्यासाठी विभागाकडून बाहेरील समिती पाठविण्यात येईल. रस्त्यांना असणारे साईन बोर्ड, पिकअप शेड, दिशादर्शक फलक कामे वेळत पूर्ण करावीत.’ यावेळी सचिव श्री. साळोखे, अधीक्षक अभियंता श्री. कुंभार, कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, उपअभियंता श्री.इंगवले, श्री.मिरजकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com