जागतिक किडणी विकार दिन

जागतिक किडणी विकार दिन

मूत्रपिंड विकाराबाबत
जनजागृती रॅली
कोल्हापूर, ता. ११ : जागतिक मूत्रपिंड दिनानिमित्त देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, पार्वतीदेवी कुंभार कॉंलेज ऑफ नर्सिंग मगदूम एण्डो सर्जरी इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली.
मूत्रपिंड विकाराच्या रुग्णात वाढ होत आहे. जगभरात ८० कोटी लोक किडनी विकाराने त्रस्त आहेत. जीवन शैलीतील बदलांमुळे स्थुलपणा रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, संधिवाताचे प्रमाण वाढले आहे. मूतखड्याचे विकारामुळे किडनी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. किडनीचे असे दुष्परिणाम टाळता येणे शक्य आहे. किडनी कोठे असते, त्याचे कार्य कोणते घटक किडनीसाठी अपायकारक आहेत, किडनी खराब झाल्यास डायलेसीस करावे लागते. गंभीर किडनी विकारावर किडनी प्रत्यारोपण करण्याचा पर्याय अवलंबवावा लागतो. यासाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवावी, रक्तदाब नियंत्रित ठेवावा, औषधांचा अतिरेक टाळावा, मुतखड्याच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नये आदी संदेश या जनजागृती रॅलीव्दारे देण्यात आले. डॉ. विश्‍वनाथ मगदूम, डॉ. विजय चव्हाण, डॉ. प्रकाश शरबिद्रे, डॉ. योगिता नाईक, डॉ. ज्योती कदम, प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, प्राचार्य एस. जे. फराकटे, डॉ. डी. सी. शेख, डॉ. सविता रासम, डॉ. आर. एस. नाईक, प्रा. एस. एस. बेनाडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com