Sun, May 28, 2023

आजरा ः पोलीस वृत्त
आजरा ः पोलीस वृत्त
Published on : 11 March 2023, 3:36 am
आजऱ्यात मोबाईल चोरट्यास अटक
आजरा ः येथील बाजारपेठेत शुक्रवारी (ता. १०) मोबाईल चोरटा संशयितरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडे चोरीतील मोबाईल सापडला. प्रेमा आनंदा वडर (वय ३२, रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. विठ्ठल बिरू गावडे (रा. आवंडी, धनगरवाडा) यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याला शनिवारी (ता. ११) आजरा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.