
-
gad११५.jpg
88408
गडहिंग्लज : क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात आदर्श विद्यार्थ्यांना गौरविताना अण्णासाहेब बेळगुद्री, दिनकर रायकर.
क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
गडहिंग्लज : येथील क्रिएटीव्ह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव अण्णासाहेब बेळगुद्री अध्यक्षस्थानी होते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विविध बौद्धिक व क्रीडा स्पर्धा घेतल्या होत्या. यात नर्सरी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवले. फरहान नूलकर व आदित्यी ढेरे यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरवले. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील विजेत्या ब्ल्यू हाऊस व उपविजेत्या ग्रीन हाऊसमधील प्रतिनिधींचा सत्कार झाला. स्पर्धा प्रमुख व्हिक्टोरिया मस्काऱ्हेन्स, मुख्याध्यापक दिनकर रायकर आदी उपस्थित होते.