कागल :आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीचा पुन्हा छापा

कागल :आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीचा पुन्हा छापा

4876
कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्या येथील निवासस्थानी शनिवारी चौकशी करून बाहेर पडताना ‘ईडी’चे अधिकारी.

04875
कागल : आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानाजवळ गल्लीत आलेला ‘ईडी’च्या गाड्यांचा ताफा.

04877
कागल : मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मारलेला ठिय्या.

मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा छापा
‘ईडी’ची कारवाई; कुटुंबीयांची साडेआठ तास चौकशी

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. ११ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या येथील निवासस्थानावर आज सकाळी सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने पुन्हा छापा टाकला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रकरणाच्या चौकशीसाठी ही कारवाई झाल्याचे समजते. दरम्यान, मुश्रीफ यांना ईडीने आज चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. त्यानुसार मुश्रीफ यांना सोमवारी (ता. १३) ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर रहावे लागणार आहे.

मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने दोन महिन्यांनंतर टाकलेला हा दुसरा छापा आहे. पथकाने मुश्रीफ कुटुबीयांची तब्बल साडेआठ तास चौकशी केली. मुश्रीफ घरी नसल्याने त्यांच्या पत्नी सायरा व मुलगा आबीद तसेच कुटुंबातील अन्य सदस्य चौकशीला सामोरे गेले. दरम्यान, कारवाईचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. कार्यकर्त्यांनी सकाळी मुश्रीफ यांच्या घरासमोर, तर दुपारी गैबी चौकात ठिय्या मांडला.
सकाळी आठच्या सुमारास आठ वाहने व १६ सशस्त्र जवानांसह ‘ईडी’चे पथक मुश्रीफ यांच्या दारात दाखल झाले. मुश्रीफ यांच्यासह नवीद कुठे आहेत, अशी विचारणा करीत अधिकाऱ्यांनी घराची झडती घेतली. अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ व कनिष्ठ बंधू अन्वर यांच्या घरातही जाऊन पाहणी व चौकशी केली.
दरम्यान, ही घटना समजताच मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. दारातच ठिय्या मारून निषेध सुरू केला. घरात चौकशी सुरू होती, तर घराबाहेर ‘ईडी चले जाओ’ , ‘भाजप सरकार हाय ऽऽ हाय ऽऽ’ अशी घोषणाबाजी सुरू होती. काही वेळाने कार्यकर्ते आक्रमक बनले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर कार्यकर्त्यांच्या झालेल्या वादावादीमुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत सर्वच कार्यकर्त्यांना १०० मीटरहून अधिक लांब नेले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गैबी चौकात ठाण मांडले. या वेळी ‘राष्ट्रवादी’चे नेते माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, आदिल फरास, राजेश लाटकर, भय्या माने, युवराज पाटील, शीतल फराकटे, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, नितीन दिंडे, दत्ता पाटील उपस्थित होते.
मुश्रीफ यांचे मुंबईतील चालक बाळू आंबुलकर यांनाही दुपारी सव्वाचारला ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी बोलावून चौकशी केली. त्यानंतर साडेचारला ‘ईडी’चे सर्व अधिकारी मुश्रीफ यांच्या घरातून बाहेर पडले. अधिकारी गेल्यावर भय्या माने व के. पी. पाटील यांनी समजूत काढून कार्यकर्त्यांना गैबी चौकातून घरी पाठवून दिले.
कार्यकर्त्याने घेतले डोके आपटून...
‘ईडी’ने मुश्रीफांच्या घरावर पुन्हा छापा टाकल्यावर कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी भाजप आणि ‘ईडी’विरोधात घोषणाबाजी केली. त्यात येथील सागर दावणे हा कार्यकर्ताही होता. वातावरण तणावपूर्ण बनल्यावर सागरने स्वत:चे डोके आपटून घेतले. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या सागरला पोलिसांनी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात न जाता सागर मुश्रीफांच्या घरासमोर घोषणाबाजी करीतच राहिला.

इमारतीवर चढून निषेध
गैबी चौकातील एका इमारतीवर चढून संजय चितारी व अन्य कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला व त्या कार्यकर्त्यांना खाली उतरविले. दररोज दूध देणारा गवळी व मदतीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले.

04879
कागल ः संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सायरा मुश्रीफ.

सतत चौकशीपेक्षा
आम्हाला गोळ्या घाला
---
सायरा मुश्रीफ यांची संतप्त प्रतिक्रिया
‘ईडी’चे पथक दाखल होताच मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी ‘सारखं-सारखं येऊन चौकशी करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार करा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. या वेळी कार्यकर्त्यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असा त्यांना धीर दिला. त्या म्हणाल्या, ‘‘गोरगरीब जनतेचे काम करणाऱ्या माणसाला त्रास दिला जात आहे.’’ या वेळी त्यांना अश्रूही अनावर झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महिला पोलिसांनी सायरा यांना घरात जाण्यास सांगितले. या वेळी भय्या माने, शीतल फराकटे व अन्य कार्यकर्त्यांनी सायरा मुश्रीफ यांना सावरले. त्यानंतर सायरा यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

००००००००००००००

Kgl111.jpg
फोटो :
कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्या येथील निवासस्थानी शनिवारी चौकशी करून बाहेर पडताना ‘ईडी’चे अधिकारी.

Kgl112.jpg
फोटो :
कागल : आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानाजवळ गल्लीत आलेला ‘ईडी’च्या गाड्यांचा ताफा.

Kgl113.jpg
फोटो :
कागल : मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मारलेला ठिय्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com