रेल्वे दोन दिवस बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे दोन दिवस बंद
रेल्वे दोन दिवस बंद

रेल्वे दोन दिवस बंद

sakal_logo
By

२२, २३ मार्चला
महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द

कोल्हापूर ः दौंड ते मनमाड मार्गावर रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातून गोंदियाला सुटणारी व गोंदियातून कोल्हापूरला येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस येत्या २२ व २३ मार्चला बंद राहणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रबंधक विजयकुमार यांनी दिली. महाराष्ट्र एक्स्प्रेसला कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाला वेग आला आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची काही ठिकाणी चाचणी होत आहे, तर काही ठिकाणी तांत्रिक दुरुस्तीचे काम होत आहे. तेवढ्या कालावधीसाठी काही ठराविक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येतात. त्यानुसार महाराष्‍ट्र एक्स्प्रेसच्या फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत.