
विचार बदलला तर अस्तित्व बदलेल; संयम मेहरा
88451
कोल्हापूर : ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या वतीने शनिवारी झालेल्या कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करताना संयम मेहरा. यावेळी राजेश रोकडे, नितीन खंडेलवाल, दिलीप लागू, साहील मेहरा, भरत ओसवाल, राजेश राठोड, संजय पाटील, दीपक वेर्णेकर, दिनकर ससे, विजय हावळ, माणिक जैन आदी.
विचार बदलला तर अस्तित्व बदलेल
संयम मेहरा; ‘जीजेसी‘तर्फे लाभम कार्यशाळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : विचार बदलला तर अस्तित्व बदलेल, असे स्पष्ट मत ‘जीजेसी‘चे अध्यक्ष संयम मेहरा यांनी आज व्यक्त केले. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या (जीजेसी) वतीने येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सराफ व्यावसायिकांसाठी लाभम कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मेहरा म्हणाले, ‘‘पारंपरिक चालणाऱ्या आपल्या व्यवसायातील बदलासाठी आपला विचार प्रथम बदल केला तर त्यानुसार व्यवसायात सकारात्मक बदल होतील.‘‘
उपाध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले, ‘‘आपण संगठित नसल्यानेच सरकारच्या वतीने पारंपरिक, पिढ्यान पिढ्या विश्वासावर चालणाऱ्या या व्यवसायावर निर्बंध आणले जात आहे. आपण संघटीत होऊन याविरुद्ध लढा देऊया.‘‘
‘जीजेसी’चे माजी उपाध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी दृष्टिकोन बदलला तर ग्राहकांचा आपल्या व्यवसायावर आणखी विश्वास वाढेल, असे सांगितले. चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल यांनी ‘जीएसटी‘ व ‘एचयूआयडी‘विषयी विस्ताराने मार्गदर्शन केले. सभासदांच्या शंकांचे समाधानही त्यांनी केले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी प्रास्ताविकात लाभम कार्यशाळेचा उद्देश सांगितला. सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांचेही मार्गदर्शन झाले.
या वेळी दिलीप लागू, शहरचे उपाध्यक्ष विजय हावळ, जिल्हा उपाध्यक्ष दिनकर ससे, दीपक वेर्णेकर, तेजस धडाम, संजय पाटील, तेजपाल शहा, गजानन बिल्ले, जितेंद्र राठोड, विजयकुमार भोसले, सुहास जाधव, संजय खद्रे, राजू चोपडे, तुकाराम माने, शशिकांत मांगले, प्रतीक तिवारी यांच्यासह जिल्ह्यासह बाहेरूनही मोठ्या संख्येने सराफ व सुवर्णकार उपस्थित होते. प्रल्हाद पाटील, ‘लाभम''चे निमंत्रक साहील मेहरा यांनी सूत्रसंचालन केले. सराफ संघाचे सचिव माणिक जैन यांनी आभार मानले.
दरम्यान, येत्या एक एप्रिलपासून सहा अंकी एचयूआयडी केंद्र शासनाने सक्तीचा केला आहे. त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवाल यांनी सलग दीड तास मार्गदर्शन केले.