
इचल :घरफोडी
88469
इचलकरंजी ःकापड व्यापाऱ्याच्या बंद फ्लॅटमधील कपाटे फोडून चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.
...
इचलकरंजीत कापड
व्यापाऱ्याचा बंद फ्लॅट फोडला
१ लाख १५ हजाराचा मुद्देमाल चोरीस
इचलकरंजी, ता.११ : कापड व्यापाऱ्याचा बंद फ्लॅट फोडून चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी संजय भगवंत पाटील (वय ५३) यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना कोल्हापूर नाक्याजवळील वसंतरेखा हाईटस अपार्टमेंटमध्ये घडली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संजय पाटील गुरुवारी (ता.९) कुटुंबियासह घराला कुलूप लावून कामानिमित्त पुणे येथे गेले होते. ही संधी साधत चोरट्याने वसंतरेखा हाईटस अपार्टमेंटमधील पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरामध्ये प्रवेश करून दोन लाकडी कपाटे फोडली. साहित्य इतरत्र विस्कटून आतील लॉकर तोडून मुद्देमालावर डल्ला मारला. रोख २६ हजार रुपये आणि सोन्याचे २ झुबे, २ वेल, २ अंगठ्या, ४ टॉप्स, २ सोनसाखळी असे सोन्याचे तीन तोळे दागिने, लहान मुलांचे सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल चोरीला गेला. आज रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरटे घरातून बाहेर पडताना आवाज झाला आणि शेजाऱ्यांना जाग आली. यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते. सीसीटिव्हीच्या मदतीने पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.