इचलकरंजीत मंगळवारी
`टफ`बाबत शिबीर

इचलकरंजीत मंगळवारी `टफ`बाबत शिबीर

इचलकरंजीत मंगळवारी
`टफ`बाबत शिबिर
इचलकरंजी ः वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘टफ’ (टेक्निकल अपग्रेडेशन फंड) या योजनेबाबत उद्‌भवणाऱ्या समस्या सोडविण्याबाबत वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाच्या वतीने येथे मंगळवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रोमोशन काउंसिल आणि वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय (टेक्सटाईल कमिशनर ऑफिस) मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डीकेटीई आणि इचलकरंजी पावरलूम असोसिएशन यांच्या सहकार्याने १४ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता डीकेटीई संस्थेच्या सभागृहात हे शिबीर होत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या शिबीरात डेप्यूटी डायरेक्टर जनरल उषा पोळ, अतिरिक्त वस्त्र आयुक्त एस.पी. वर्मा, संचालक एस. के. सिंग, सहायक संचालक नरोत्तमकुमार व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रत्येक फाईल तपासण्यात येणार असून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com