संतोष पाटीलच्या फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली.
संतोष पाटील याच्या
विरोधात सहा नव्या तक्रारी
फसवणूकप्रकरणी गुन्ह्याची व्याप्ती वाढणार
कोल्हापूर, ता. ११ ः नोकरी लावतो असे सांगून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष रंगराव पाटील (वय ३८, रा.पांगिरे, ता.भुदरगड) याच्यावर गुन्हा दाखल आहे. आज आणखी सहा जणांनी संतोषने फसवणूक केल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे.
महापालिकेत नोकरी लावतो, असे सांगून पावणेदोन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याबाबतचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल होताच तक्रारींचा ओघ वाढला आहे. संशयित पाटील याच्या विरोधात शनिवारी आणखी सहा जणांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार अर्ज दिला. यातील चौघांना बँकेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने फसवणूक केली. तर दोघांना डी मार्टमध्ये नोकरी लावण्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले. फसवणुकीची रक्कम सुमारे दहा लाखांपर्यंत असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिली. फसवलेल्या काही जणांनी घरातील दागुने गहाण ठेऊन पैसे जमा केले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.