गुन्हागारी वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हागारी वृत्त
गुन्हागारी वृत्त

गुन्हागारी वृत्त

sakal_logo
By

मारहाणप्रकरणी दोघांवर गुन्हा


कोल्हापूर ः वाशी येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या मारहाणप्रकरणी शनिवारी (ता.११) करवीर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अभिलाष बाळू पुजारी आणि ज्योती अभिलाष पुजारी (दोघे रा. वाशी) अशी त्यांची नावे आहे. अनिता पुजारी यांच्याबरोबर झालेल्या वादातून दोघांनी त्यांना मारहाण केली असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. गुरुवारी (ता.९) ही घटना घडली होती.
------
पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर ः चरण (ता. शिराळा, जि. सांगली) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकाने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. संजय राऊजी कदम (वय ४२, रा. कदमवाडी, पणुंब्रे वारुण, ता. शिराळा, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी दीडच्या सुमारास घडली. कोकरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतल्यानंतर जखमी कदम याला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून त्याने पेटवून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
..........

झाडावरून पडून तरुण जखमी

कोल्हापूर ः शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी झाडावर चढलेला तरुण झाडावरून पडून जखमी झाला. अमित विश्वास सकटे (वय २५, रा. केखले, ता. पन्हाळा) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. सोमवारी (ता. ६) सायंकाळी ही घटना घडली. कोडोली येथील सरकारी रुग्णालयात उपचार घेऊन शनिवारी (ता. ११) त्याला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.