
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
88507
चंद्रपूर : महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेतर्फे दिला जाणारा पक्षी जनजागृती पुरस्कार श्रीनिवास रेड्डी यांच्या हस्ते स्वीकारताना अनंत पाटील. शेजारी सुधीर मुनगंटीवार, किशोर गोरगेवार आदी.
अनंत पाटील यांना पुरस्कार प्रदान
गडहिंग्लज : येथील पक्षिमित्र अनंत पाटील यांना महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेतर्फे दिला जाणारा स्व. रामभाऊ शिरोडे स्मृती पक्षी जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात या पुरस्काराचे वितरण झाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, अपर प्रधान मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. राजकमल जोब संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. या संमेलनाला राज्यभरातून सुमारे ३०० पक्षिमित्र उपस्थित होते.
---------------
88508
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना डॉ. अनिल कुराडे, नेताजी कांबळे. शेजारी डॉ. एस. एम. कदम, संदीप कुराडे आदी.
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. जी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व कार्यालयीन क्लार्क नेताजी कांबळे यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. आर. पी. हेंडगे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. ग्रंथपाल संदीप कुराडे, डॉ. एस. बी. माने यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. प्रा. वृषाली हेरेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. एम. जाधव यांनी आभार मानले.
-----------------
ओंकारमध्ये उद्या राष्ट्रीय चर्चासत्र
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालय व भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेतर्फे (आयसीएचआर) मंगळवारी (ता. १४) राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. गडहिंग्लज परिसरातील स्वातंत्र्य आंदोलनातील ज्ञात-अज्ञात नायक या विषयावर हे चर्चासत्र होईल. आयसीएचआरचे सदस्य सचिव डॉ. उमेश कदम यांची प्रमुख उपस्थिती आहे. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर अध्यक्षस्थानी असतील. नूल मठाचे भगवानगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत. साधन व्यक्ती म्हणून डॉ. चंद्रवदन नाईक, डॉ. निलांबरी जगताप मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शनही होणार आहे. इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी केले आहे.