नांदणीमध्ये पाककला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदणीमध्ये पाककला स्पर्धा
नांदणीमध्ये पाककला स्पर्धा

नांदणीमध्ये पाककला स्पर्धा

sakal_logo
By

नांदणीमध्ये पाककला स्पर्धा
इचलकरंजी : नांदणी येथील नरदे हायस्कूलमध्ये पाककला कृती स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्‍घाटन उद्योजिका सविता आवटी यांनी केले. परीक्षक म्हणून प्रज्ञा देसाई, वर्षा भगाटे यांनी काम पहिले. स्पर्धेस महिला पालकांचा सहभाग उल्लेखनीय होता. अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका पी. पी. देसाई यांनी केले. एस. ए. गरड, पी. जी. सुतार, एस. एस. पाटील, पी. आर. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. एस. भगाटे यांनी केले. आभार पी. एन. दिवटे यांनी मानले.
------------------
स्वरा, शौर्या निर्मळे यांचा सत्कार
इचलकरंजी : शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील स्वरा नामदेव निर्मळे व शौर्या नामदेव निर्मळे या दोघी बहिणींनी एका मिनिटात ७२ वेळा व ३८ वेळा नाकाला जीभ लावण्याचा पराक्रम केला आहे. त्यांची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. त्यांच्या या पराक्रमाने टाकळीवाडीची मान उंचावली आहे. त्यांच्या या कलेची दखल घेत अभिनव बाल विकास मंदिर व परिवर्तन प्राथमिक शाळा दत्तवाडतर्फे सत्कार केला. बबन चौगुले, मुख्याध्यापक पुंडलिक खोत आदी उपस्थित होते.
-------------------
न्यू ॲक्टिव्ह ग्रुपतर्फे स्पर्धा
इचलकरंजी : न्यू ॲक्टिव्ह ग्रुपतर्फे मेहंदी, नॅचरल सरबत, व फूट सॅलड स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. मेकअप आर्टिस्ट नेहा व करिष्मा भाटिया, गीता यांनी महिलांना आरोग्याची व चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी. आपले सौंदर्य कसे राखावे याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. स्वागत लोकरे, राजू लायकर, कविता शिंगाडे, रेखा विरंजे, रजनी शिंदे, विजय माळी, नेहा कुंभार उपस्थित होत्या. सूत्रसंचालन दिमी लोकरे, मिनाज शेख यानी केले. आभार सरिता पांडव यांनी मानले.