विनय कोरेंच्या अभिनंदनाचा 
लिंगायत समाजातर्फे ठराव

विनय कोरेंच्या अभिनंदनाचा लिंगायत समाजातर्फे ठराव

gad126.jpg
88556
गडहिंग्लज : महामंडळाच्या निर्णयाने लिंगायत समाजाने आनंद व्यक्त केला. बसवेश्‍वर पुतळ्याला अभिवादनप्रसंगी समाजबांधव उपस्थित होते.
---------------------------------------------------------
विनय कोरेंच्या अभिनंदनाचा
लिंगायत समाजातर्फे ठराव
महामंडळासाठी केले प्रयत्न; आतषबाजी, साखर-पेढे वाटून आनंद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : आमदार विनय कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने लिंगायत धर्मासाठी महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याची घोषणा केली. त्याबद्दल कोरे यांचा समाजातर्फे अभिनंदनाचा ठराव केला. शासनाच्या या निर्णयाचे फटाक्यांची आतषबाजी व साखर-पेढे वाटून स्वागत केले.
मुंबईतील आझाद मैदानावर २९ जानेवारीला विराट मोर्चा झाला. अखिल भारतीय लिंगायत समन्वयक समितीच्या माध्यमातून लिंगायतांसाठी महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. शासनातर्फे विनय कोरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले होते. त्यावेळी कोरे यांनी समाजातील अनेक तरुण रोजगार व आर्थिक सोयी सवलतीपासून दूर राहिले असून सर्वच विकासापासून हा समाज वंचित राहिल्याने लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली होती.
दरम्यान, त्यांच्या पाठपुराव्यामुळेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाची घोषणा करून ५० कोटींची तरतूद केल्याचेही जाहीर केले. या निर्णयाबद्दल समाजबांधवांनी वीरशैव चौकातील बसवेश्‍वर पुतळ्याजवळ आनंद साजरा केला. पुतळ्याला अभिवादन केले. श्री. कोरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळाचेही अभिनंदन केले. यावेळी महेश आरभावी, बसवराज आजरी, राजेंद्र तारळे, रमेश रिंगणे, सोमगोंडा आरबोळे, राजशेखर दड्डी, सुरेश कोळकी, संजय संकपाळ यांची भाषणे झाली. नरेंद्र भद्रापूर, बाळासाहेब गुरव, बी. बी. पाटील, उदय पाटील, अभिषेक पाटील, दयानंद पाटील, प्रीतम कापसे, राजशेखर यरटे, महेश तुरबतमठ, प्रवीण मेणसे, महेश घुगरी, सचिन घुगरी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com