
‘डीकेएएससी’त पर्यावरणपूरक रंगप्रदर्शन
ich129.jpg
88571
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंगप्रदर्शनाचे आयोजन केले होते.
‘डीकेएएससी’त पर्यावरणपूरक रंगप्रदर्शन
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात पर्यावरणपूरक रंगप्रदर्शनाचे आयोजन केले होते. वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून त्याची मांडणी केली. नैसर्गिक रंग हे मानवास हानीकारक नसतात. त्यामुळे जास्वंद, गुलाब, पालक, झेंडू, जांभूळ, हळद, बीट, गोकर्ण आदी वनस्पतीपासून विद्यार्थ्यांनी रंग तयार केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. डी. सी. कांबळे होते. विभाग प्रमुख एस. टी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. मधुमती शिंदे यांनी केले. आभार डॉ. संदीप गावडे यांनी मानले. प्रा. भारती डोपारे, डॉ. आम्रपाली कट्टी, प्रा. उर्मिला चौगुले, डॉ. वर्षा दवंडे आदी उपस्थित होते.
-----------
ich1210.jpg
88570
इचलकरंजी : कन्या महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील भित्तीपत्रिकेचे उद्घाटन झाले.
कन्या महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे उद्घाटन
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रेवरील भिंत्तीपत्रिकेचे उद्घाटन झाले. संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित भित्तीपत्रिकेचे उद्घाटन डीकेएएससी कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. अरुण कटकोळे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रा. संगीता पाटील होत्या. इतिहास विभाग प्रमुख डॉ. धीरज शिंदे, प्रा. राजश्री मालेकर, प्रा. अनिल जांभळे आदी उपस्थित होते.
------------
इचलकरंजी हायस्कूलचे यश
इचलकरंजी : इचलकरंजी हायस्कूलने राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश मिळवले. १४ वर्ष वयोगटात प्रसाद पिष्टे याने उंचउडीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धा चंद्रपूर येथे ॲथलेटिक्स असोसिएशन व क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने झाल्या. यशाबद्दल संस्थेच्या मानद सचिव सपना आवाडे, मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. एच. उपाध्ये यांनी अभिनंदन केले. पर्यवेक्षक यु. पी. पाटील, क्रीडाप्रमुख व्ही. एस. गुरव, डी. वाय. कांबळे, बी. एम. थोरवत, सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कूल, तिळवणी येथे यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी झाली. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. अध्यक्षस्थानी मुसा शेख होते. विषय शिक्षक भरत पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मानसी ठाकूर यांन केले. आभार सुहास गायकवाड यांनी मानले.
----------
हटकर कोष्टी समाजातर्फे नेत्र शिबिर
इचलकरंजी : कोल्हापूर जिल्हा हटकर कोष्टी समाजातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले. शिबिरामध्ये समाजातील दोनशेहून अधिक समाज बांधवांनी सहभाग घेतला. १०७ जणांना मोफत चष्मे दिले. ३६ जणांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात करून देण्याचे समाजाने ठरवले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके, संजय कांबळे, विश्वनाथ मुसळे, विलास पाडळे, रमेश कबाडे, डी. एम. कस्तूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल तेलसिंगे यांनी स्वागत केले. हेमंत कबाडे यांनी प्रास्ताविक केले. सुनील सरबी यांनी सूत्रसंचालन केले.