
चव्हाण जयंती
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
---
88611
महापालिका
कोल्हापूर ः राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे आज छत्रपती ताराराणी सभागृहात नगरसचिव सुनील बिद्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यता आला. या वेळी सिस्टिम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, तुषार भरसट, इरशाद शेख, देवानंद कांबळे आदी उपस्थित होते.
---
88629
जिल्हा परिषद, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
कोल्हापूर ः नवमहाराष्ट्राचे शिल्पकार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची नवमहाराष्ट्र उभारणी आणि पंचायत राज योजना व विकासाभिमुख महाराष्ट्र अशा अनेक पैलूंनी घडलेली कारकीर्द विस्मरणात जाऊ नये, नवीन पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी ती त्यांच्यापर्यंत पोचविण्याची जबाबदारी आपली आहे, असे डॉ. भारती पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा परिषद आवारातील (कै.) चव्हाण यांच्या पुतळ्यास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हा केंद्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी महापौर ॲड. महादेवराव आडगुळे, रमेश मोरे, विजयसिंह पाटील, अशोक पोवार आदी उपस्थित होते.
--
88681
महावीर महाविद्यालय
कोल्हापूर ः महावीर महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलताना प्रा. विश्वास पाटील. शेजारी अन्य मान्यवर.
कोल्हापूर ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, महावीर महाविद्यालय अभ्यास केंद्रात ज्येष्ठ समंत्रक प्रा. विश्वास पाटील यांच्या हस्ते (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श आजच्या राजकीय नेत्यांनी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, केंद्र संयोजक प्रा. जयवंत दळवी, नेताजी गिरी प्रमुख उपस्थित होते. तुकाराम चांदणे, सुलभा सुतार, तेजस्विनी भोसले, किरण कानडे, रणजित पाटील, सचिन कांबळे, धनश्री स्वामी, स्वाती पाटील, इम्रान शेख आदी उपस्थित होते. प्रा. रूपेश हळदकर यांनी स्वागत केले. केंद्र सहायक बसवराज वस्त्रद यांनी आभार मानले.