
श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तीमत्व विकासाला चालना; एस. आर. देशमुख
88615
जांबरे : र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी शिवप्रतिमेचे पूजन करताना प्रा. एस. एन. पाटील. शेजारी एस. आर. देशमुख, सरपंच विष्णू गावडे, लक्ष्मण गावडे आदी.
श्रमसंस्कार शिबिरातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना
एस. आर. देशमुख; जांबरे येथे माडखोलकर महाविद्यालयाच्या शिबिराची सांगता
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १२ : महाविद्यालयांतर्फे राबवल्या जाणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत एस. आर. देशमुख यांनी व्यक्त केले. जांबरे (ता. चंदगड) येथे र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एनएसएसचे जिल्हा समन्वयक प्रा. संजय पाटील अध्यक्षस्थानी होते.
सात दिवसांच्या शिबिरात विविध उपक्रम राबवण्यात आले. तहसीलदार विनोद रणावरे, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते शिबिराचे द्दघाटन झाले. एलिफंट अंकल आनंद शिंदे, विश्वनाथ पाटील, कृषितज्ज्ञ सुरेश माने, राजश्री गावडे, प्रा. सरोजिनी दिवेकर, अॅड. आर. पी. बांदिवडेकर यांनी मार्गदर्शन केले. पशुधन काळजी व दुग्ध व्यवसाय या विषयावर ‘गोकुळ’चे सहायक व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे व डॉ. अनिल परगणे यांनी माहिती दिली. ए. कुमार यांचे जादूचे प्रयोग झाले. स्वयंसेवकांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी शिबिराला भेट देऊन कौतुक केले. स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, पाणी व्यवस्थापन, जलसाक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, प्रदूषण मुक्ती, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, योग आणि प्राणायाम, अवयवदान, श्रम प्रतिष्ठा आदी विषयांवर ग्रामस्थांचे प्रबोधन केले.