मंगळवार पेठेत अपुरे पाणी

मंगळवार पेठेत अपुरे पाणी

मंगळवार पेठ, शिवाजी पेठेत
रंगपंचमीदिवशी पाण्याचा ठणठणाट
कोल्हापूर, ता. १२ ः कळंबा फिल्टर हाउसजवळील व्हॉल्व्ह काल (ता. ११) रात्री नादुरुस्त झाल्याने आज मंगळवार पेठ, शिवाजी पेठेतील अनेक भागांत पाणीपुरवठा झाला नाही. काही भागांत अपुरा पाणीपुरवठा झाला. ऐन रंगपंचमी दिवशी झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.
कळंबा फिल्टर हाउसपासून मंगळवार पेठ, पाण्याचा खजिना, शिवाजी पेठेकडे जाणाऱ्या पाइपलाईनवरील व्हॉल्व्हची झापडी पडली. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा बंद झाला. आज व्हॉल्व्ह दुरुस्तीला दिला असल्याचे सांगण्यात आले. उद्या (ता. १३) पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले. पण, आज सकाळी मंगळवार पेठ, शिवाजी पेठेतील अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. काही भागांत तासभर; पण कमी दाबाने पाणी आले. रंगपंचमी असल्याने घरांमध्ये नेहमीप्रमाणे सकाळी गडबड नव्हती. पण, रंगपंचमी खेळून आल्यावर अंघोळीसाठी, कपड्यांसाठी पाणी अपुरे पडले. त्यामुळे अनेकांना खासगी टॅंकर मागवावे लागले; तर जिथे कूपनलिका होत्या, त्यांचे पाणी वापरण्यात आले. महापालिकेनेही टॅंकरची व्यवस्था केली होती.
गेल्या काही दिवसांपासून मंगळवार पेठ, शिवाजी पेठ भागात पाण्याचा प्रश्‍न जाणवत आहे. या भागात कळंबा फिल्टरकडून येणाऱ्या जलवाहिनीवरील व्हॉल्वची नादुरुस्ती होत आहे. त्याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रार करूनही मार्ग निघालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com