
भाजीपाला बाजार पडला; रंगपंचमीचा परिणाम
88641
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी मंडईत दुपारी, सायंकाळी गर्दी जाणवत नव्हती.
कलिंगड, टरबूज, द्राक्षांची वाढली आवक
फळभाजी, पालेभाज्यांच्या दरात काहीशी कपात; लिंबू दहा रुपयाला तीन ते चार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : रंगपंचमीमुळे लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ आदी मंडईत गर्दी कमी जाणवली. परिणामी फळभाजी, पालेभाज्यांच्या दरात ही काहीशी कपात झालेली दिसली. ३०/४० रुपये किलो असे दर राहिले. कलिंगडांची आवकही वाढलेली असून, टरबूज, हिरवी अन् काळी द्राक्षांची आवक उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर वाढलेली आहे. लिंबू दहा रुपयाला तीन ते चार प्रति नग विक्री सुरू आहे.
...
चौकट
फळभाजी (प्रतिकिलो रुपये)
हिरवा वाटाणा *२०/३०
हैदराबादी काळी वांगी *३०
शेवगा शेंग *१० रुपयाला तीन शेंगा
काळा दिडगा शेंग *५०
लाल बीट *५/१० रुपये नग
बिनीस *३०
फ्लॉवर *२०/२५ रुपये एक नग
कोबी *१० रुपये एक नग
हिरवा टोमॅटो *१०
लाल टोमॅटो *१०/२०
हिरवी पांढरी वांगी *४०
ढब्बू मिरची *४०
वरणा *४०
जवारी काकडी *४०
काटेरी काकडी *२०
लिंबू *१० रुपयाला चार/पाच
हेळवी कांदा *१०/२०
लसूण *१००
बटाटा *२०
दोडका *३०
देशी गाजर *२०
भेंडी *८०
देशी गवारी *१००
बंदरी गवारी *६०
हिरवी मिरची *४०
तोंदली *५०
घोसावळे *४०
कच्ची केळी *४० रुपये डझन
कच्ची हळद (लोणचे) *४०
नवलकोल *१० रुपयाला दोन नग
सुरण गड्डा *८०
आळूचे गड्डे *८०
खुटवडा *४०
केळ फुल *२०
ब्रोकोली गड्डा *१० रुपये नग
पांढरा कांदा *२०
...
चौकट
पालेभाजी (प्रतिपेंडी)
कोथिंबीर *५/१०
लाल माट *५/१०
तांदळी *५/१०
मेथी *१०
पालक *१०
करडई *१५ रुपयाला दोन पेंड्या
चुका *१०
आंबाडा *१०
पोकळा *१०
...
चौकट
फळांचे दर (प्रतिकिलो)
देशी पेरु *५०
हिरवी कलिंगडे *१०/५० (आकारमानानुसार)
हिरवी द्राक्षे *४०/५०
देशी केळी *४०/५० रुपये डझन
टरबूज *१० रुपयाला एक नग
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर (प्रतितोळा/प्रतिकिलो) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने *५७, ९९० प्रतितोळा
चांदी *६८, ७०० प्रतिकिलो
...
चौकट
मिरचीचे दर (प्रतिकिलो)
ओरिजनल कर्नाटकी ब्याडगी *६५० ते ८००
सिजेंटा ब्याडगी *४५० ते ६००
एमपी दिल्लीहाट ब्याडगी *३५० ते ४५०
लाली ब्याडगी *३०० ते ४५०
संकेश्वरी प्युअर *१४०० ते १८००
साधी जवारी *३५० ते ४५०
लवंगी *३०० ते ३५०
काश्मिरी *६०० ते ७५०
गरुडा *३५० ते ४००
...
चौकट
धान्य-कडधान्य (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरबरा डाळ *७०/७५
तुरडाळ *११५/१२०
मसूर डाळ *९५
मुगडाळ *११५/१२०
उडीद डाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळ वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणा *१२०/१३०
साबदाणा *६५/७०
साखर *४०