उखाना, संगीत खुर्ची स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उखाना, संगीत खुर्ची स्पर्धा
उखाना, संगीत खुर्ची स्पर्धा

उखाना, संगीत खुर्ची स्पर्धा

sakal_logo
By

०२०७६
सावर्डे दुमाला ः येथे स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करताना सरपंच भगवान रोटे, प्रकाश कदम, ग्रा.पं सदस्य.

कारंडे,पाडळकर, खाडे, कांबळे,
भोसले यांना प्रथम क्रमांक

शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी रांगोळी, लिंबू चमचा, उखाणा, बादलीत चेंडू टाकणे, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. यात उखाणा स्पर्धेत पूनम कारंडे, रांगोळी स्पर्धेत प्रतीक्षा पाडळकर, स्वाती सुतार, लिंबू चमचामध्ये श्रुतिका खाडे, गायत्री भोसले, बादलीत चेंडू टाकणेमध्ये अश्विनी कांबळे, आरोही गुरव, संगीत खुर्चीमध्ये मयुरी भोसले, समीक्षा भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकवला. सायंकाळच्या सत्रात व्हिजन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोपार्डे यांच्या विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर धाले. यात १५० महिलांची मोफत आरोग्य तपासणी झाली. सरपंच भगवान रोटे, उपसरपंच प्रकाश कदम, माजी सरपंच भगवान पाडळकर, हिंदूराव भोसले, निवृत्ती कारंडे, युवराज पाटील उपस्थित होते. . स्वागत ग्रा. पं सदस्य दिगंबर कारंडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाडळकर यांनी केले. आभार तुषार निकम यांनी मानले.