शृंगारवाडी, उचंगी शाळेत डिजीटल पाटीचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शृंगारवाडी, उचंगी शाळेत
डिजीटल पाटीचे वाटप
शृंगारवाडी, उचंगी शाळेत डिजीटल पाटीचे वाटप

शृंगारवाडी, उचंगी शाळेत डिजीटल पाटीचे वाटप

sakal_logo
By

88672
शृंगारवाडी (ता. आजरा) : येथे डिजिटल पाटीचे वाटप प्रसंगी गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहायक गटविकास अधिकारी अविनाश पाटील, सरपंच समीर देसाई, उपसरपंच राजेश देसाई, विद्यार्थी व मान्यवर.

शृंगारवाडी, उचंगी शाळेत
डिजिटल पाटीचे वाटप
आजरा, ता. १३ : शृंगारवाडी, उचंगी या प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थांना डिजिटल पाटीचे वाटप करण्यात आले. शृंगारवाडी - उचंगी ग्रुप ग्रामपंचायतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना शिक्षणाविषयी आवड वाढावी. अभ्यासामध्ये गोडी निर्माण व्हावी, विध्यार्थ्यांना अंकगणित, चित्रे, अभ्यास करणे सोपे व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीने आणखी एक पाऊल उचलले आहे, असे सरपंच समीर देसाई व ग्रामसेवक मुरलीधर कुंभार यांनी सांगितले. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहायक गटविकास अधिकारी अविनाश पाटील व मान्यवरांच्या हस्ते डिजिटल पाटीचे वाटप झाले. उपसरपंच राजेश देसाई, जयश्री कळेकर, विमल पाटील, संगीता कांबळे, अंकुश तारळेकर, सीमा देसाई, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामराव हरेर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील उपस्थित होते.