सोलर वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलर वापर
सोलर वापर

सोलर वापर

sakal_logo
By

विशेष
-
उदयसिंग पाटील

सौर उर्जा वापरा, बचत करा
महापालिकेने घ्यावा पुढाकार; कार्यालये, पथदिव्यांच्या विजेपोटी होणारा कोट्यवधींचा खर्च वाचणार

कोल्हापूर, ता. १३ ः पारंपरिक स्त्रोतामधून तयार केली जाणारी वीज वाचवण्यासाठी सौर उर्जेच्या वापरासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. महापालिका पारंपरिक उर्जेवरच अवलंबून असून, कार्यालये, पथदिव्यांसाठी दरवर्षी ९३ लाखांवर युनिट विजेचा वापर केला जात आहे. त्यासाठी महिन्याला एक कोटी व वर्षाकाठी सव्वा सात कोटी रुपये खर्च होत आहेत. पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले रूग्णालय, छत्रपती शिवाजी मार्केट, आयुक्त बंगला येथेच वापरली जाणारी सौर उर्जा अन्य ठिकाणीही वापरली तरी महापालिकेच्या खर्चात बचत होऊ शकते. याशिवाय पाणी उपसा पंपांसाठी वर्षाला ४२ कोटी महावितरणला द्यावे लागणार नाहीत.
महापालिकेने २०१५ मध्ये सौर उर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली. त्यावेळी छत्रपती शिवाजी मार्केट या इमारतीसाठी बॅटरी बॅकअप असलेली सौर यंत्रणा वापरली. त्यानंतर २०१८ मध्ये पंचगंगा हॉस्पिटलसाठी, तर २०२० मध्ये आयुक्त बंगल्यासाठी वापर केला. या दोन्ही यंत्रणा नेट मीटरिंगच्या माध्यमातून राबवल्या. एक हजारच्या आसपास युनिट विजेची बचत केली जात आहे. हे प्रमाण महापालिकेच्या एकूण वीज वापराच्या तुलनेत अत्यल्प आहे. पाणी उपसा पंपांना मोठ्या प्रमाणात वीज लागत असल्याने महापालिकेच्या खर्चातील सर्वाधिक वाटा त्यांचा आहे. त्यापाठोपाठ शहरातील पथदिव्यांवर महापालिका विजेचा खर्च करत आहे. तीन वर्षांपूर्वी एलईडी दिवे बसवल्याने वीज बिलात दीड कोटी रुपयांचा फरक पडला आहे; पण अजूनही सात कोटींवर केवळ पथदिव्यांसाठी खर्च केला जात आहे. तर सर्व कार्यालयांसाठी अडीच ते पावणेतीन लाख युनिट वीज लागते. त्याचे वीस ते पंचवीस लाख रुपयांचे बिल येत आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाजासह पदाधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या इमारतीचा विजेचा खर्च जास्त आहे. ही इमारत हेरिटेज असल्याने त्यावर सौर यंत्रणा उभी करणे कठीण आहे; पण शेजारील छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीवर त्या इमारतीसह मुख्य इमारतीसाठीची यंत्रणा उभी केली जाऊ शकते. इतर तीन विभागीय कार्यालयांच्या इमारती, वॉर्ड दवाखाने, रुग्णालये, आरोग्य विभागाची कार्यालये, केएमटी अशा विविध ठिकाणी सौर उर्जेची संधी आहे; पण आता छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये असलेली जुनी यंत्रणा बदलून नवीन यंत्रणा लावण्याचे प्रस्तावित केले आहे.

चौकट
पथदिव्यांचा वीज वापर (वार्षिक)
वर्ष ः युनिट ः बिल
२०१८-२०१९*१११७५६६०*८२२३९७६०
२०१९-२०२०*१०२११८७२*८१५६५८९०
२०२०-२०२१*९४०५८००*७२११७८४२
२०२१-२०२२*९११४४३२*७१५१२०००.
................
चौकट
पथदिव्यांची संख्या ः ३१२४१.
...........................................
चौकट
महापालिका कार्यालयांचा वीज वापर (वार्षिक)
वर्ष ः युनिट ः बिल
२०१९-२०२०*२६९४२९*२५१९३२०
२०२०-२०२१*२५०४७४*१९३५६००
२०२१-२०२२*२७४८०९*१२६१७००.
.......
कोट
हेरिटेज इमारतींमुळे काही कार्यालयांच्या ठिकाणी सौर यंत्रणा उभी करण्यात अडचणी आहेत. त्याशिवाय इतर कार्यालयांचा प्रस्ताव तयार केला जात आहे. पथदिव्यांसाठी मात्र अजून काही विचार केलेला नाही.
-नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता.