
वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानाची वागणूक द्या; बाबासाहेब वाघमोडे
88712
गडहिंग्लज : सारथी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे झालेल्या कार्यक्रमात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गौरव प्रसंगी बाबासाहेब वाघमोडे, रघुनाथ कांबळे, प्रा. सुनील शिंत्रे, सुभाष धुमे, श्रद्धा शिंत्रे, रेखा पोतदार, राजन पेडणेकर आदी.
वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानाची वागणूक द्या
बाबासाहेब वाघमोडे; गडहिंग्लजला सारथी ट्रस्टतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : वृत्तपत्र विक्रेता हा घटक महत्त्वाचा आहे. थंडी, पाऊस याची तमा न बाळगता बारा महिने अव्याहतपणे घरोघरी वृत्तपत्र पोचविण्याचे काम करतात. त्यांना समाजाने सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी केले.
येथील सारथी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी वाघमोडे बोलत होते. वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सचिव रघुनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कांबळे म्हणाले, ‘‘वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ व्हावे, यासाठी गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महामंडळ स्थापन होत नाही तोवर लढा सुरूच राहील.’’ प्रा. शिंत्रे यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्याची संधी मिळाली याचे समाधान आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांना विमा कवच देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर, साताप्पा कांबळे, रमजान अत्तार, मधुकर येसणे, कुमार पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश कट्टी, माधुरी कुंभीरकर, ज्योती कुराडे, शोभा शिंत्रे, सुधा फाळके, अशोक मोहिते आदी उपस्थित होते. सुभाष धुमे यांनी स्वागत केले. रेखा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे यांनी आभार मानले.
------------------
चौकट...
यांचा झाला गौरव...
गडहिंग्लज तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महादेव आडसुळे, नामदेव लुगडे, सुरेश खोत, चंद्रकांत नेवडे, अजित स्वामी, विजय देवान्नावर, रोहित कोकितकर, काशिनाथ गडकरी, बाळकृष्ण शेटके, श्रीधर देसाई, आनंदा गुरव, भीमराव माने, विजय सुतार, दत्तात्रय घुगरे, सुशांत आडसुळे, बंडोपंत केसरकर, दशरथ सुतार, गोरखनाथ पाटील, विठ्ठल जाधव, बाळासाहेब पोवार, बाळासाहेब हेब्बाळे, इराप्पा नाईक, अशोक गुडसे, विनायक कडूकर, विलास मगदूम, काशिनाथ पाटील, रमेश भोसले, रवींद्र कोंडुसकर, महादेव गायकवाड, किरण मांगले, कुमार करशेट्टी, भैरू ताशीलदार, बबलू निकम, विजय घेवडे, दयानंद पोवार, मुकुंद दळवी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.