
जुनी पेन्शन
जुनी पेन्शन संघटनेचा पाठिंबा
कोल्हापूर, ता. १३ : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील २५ हजार सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर जात आहेत. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, यासाठी होणाऱ्या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाही सहभाग घेवून पाठिंबा देणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी आज दिली. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
धनवडे म्हणाले, राज्य मध्यवर्ती संघटनेने शासकीय व निमशासकीय, शिक्षक व अन्य या कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसह अन्य मागण्यासाठी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. चर्चा करुन हा प्रश्न निकालात निघाला असता. पण सरकार यावर चर्चा करण्यास तयार नाही. काँगेसचे सरकार असणाऱ्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सुरु केली आहे. महाराष्ट्रात मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला तरच तोडगा निघू शकतो. सरकारला या प्रश्नाचे गांभीर्य नाही. त्यामुळे हे आंदोलन होणारच आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाही सक्रीय सहभाग घेणार आहे.’ यावेळी श्रीनाथ पाटील, जिल्हा महिला प्रमुख आरती पोवार उपस्थित होत्या.