क्रॉस कनेक्शनमुळे मोबाईल ग्राहक हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रॉस कनेक्शनमुळे मोबाईल ग्राहक हैराण
क्रॉस कनेक्शनमुळे मोबाईल ग्राहक हैराण

क्रॉस कनेक्शनमुळे मोबाईल ग्राहक हैराण

sakal_logo
By

संग्रहीत फोटो वापरणे

क्रॉस कनेक्शनमुळे मोबाईल ग्राहक हैराण
जयसिंगपूरमधील चित्र; इंटरनेट सेवाही सातत्याने ठप्प

जयसिंगपूर, ता. १३ः क्रॉस कनेक्शनमुळे शहरातील मोबाईल ग्राहक हैराण झाले आहेत. इंटरनेट सेवाही सातत्याने ठप्प होत असल्याने गैरसोयींत आणखी भर पडत आहे.
शहर आणि परिसरात मोबाईल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जाळे विणले आहे. सर्वच स्तरातील लोकांकडे सध्या मोबाईल वापरात आहे. सुरुवातीच्या काळात चांगल्या सेवेमुळे कंपन्यांनी ग्राहकांची संख्या वाढवली. नंतर मात्र सेवेचे बारा वाजले. व्हॉटसअप, फेसबुक यासह अनेक अॅप ॲन्डॉईड मोबाईलवर आल्याने मोबाईल ग्राहकांची संख्या वाढली. यासाठी वापरण्यात येणारा इंटरनेट पॅक कमालीच्या संथ गतीने काम करत आहे. फोरजीवरुनही तासन्‌तास डाऊनलोड अथवा पुढे पाठवण्यासाठी फॉरवर्ड केलेला डाटा अथवा फाईल इमेज जात नसल्याने अनेक कामे खोळंबली आहेत.
मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क विस्कळीत होण्याचे प्रमाण अलीकडील काळात वाढले आहे. त्यामुळे अनेकदा क्रॉस कनेक्शनचा अनुभव येऊ लागला आहे. काही दिवसांपासून अशा प्रकारांमुळे ग्राहकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. नॉट रिचेबलची डोकेदुखी वाढली आहे. लॉकडाऊनमध्येही अशा सेवेला ग्राहकांना तोंड द्यावे लागले होते. नंबर डायल केल्यास नेटवर्क नॉट रिचेबल दाखवत असते. जास्त काळ डायल केल्यास कॉल जोडला जातो. ऐकू येत नाही. यामुळे पुन्हा कॉल करावा लागतो. यामुळे ग्राहकांचा वेळ वाया जात आहे.
----------
कॉल ड्रॉपचा फटका
शहरासह ग्रामीण भागातही अशा अडचणी सातत्याने निर्माण होत आहेत. रेंज असतानाही कॉल ड्रॉपचा फटका बसत आहे. कस्टमर केअरकडे तक्रार केल्यास मोबाईलच्या सेटिंगमध्ये बदल करण्याचे पर्याय सुचवले जातात. मोबाईल कंपन्यांना चांगली सेवा पुरवण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.