स्वत:मधील सामर्थ्याने जग समृद्ध करा; इंद्रजित देशमुख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वत:मधील सामर्थ्याने जग समृद्ध करा; इंद्रजित देशमुख
स्वत:मधील सामर्थ्याने जग समृद्ध करा; इंद्रजित देशमुख

स्वत:मधील सामर्थ्याने जग समृद्ध करा; इंद्रजित देशमुख

sakal_logo
By

88796
गडहिंग्लज : केदारी रेडेकर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना इंद्रजित देशमुख.

स्वत:मधील सामर्थ्याने जग समृद्ध करा
इंद्रजित देशमुख; केदारी रेडेकर महाविद्यालयात पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते. आपापल्या क्षेत्रात त्याचा पूर्णपणे वापर केल्यास अधिक यशस्वी होता येते. निसर्गाने जे सामर्थ्य दिले आहे त्याच्या जोरावर जग संपन्न व समृद्ध करा. जागृत युवकाला हे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले.
येथील केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय व नर्सिंग स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी देशमुख बोलत होते. संस्थेच्या अध्यक्षा अंजना रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, ‘‘पंचवीस वर्षाच्या आतील वय हे पराक्रम करण्याचे असते. आपण काय बनायचे ते याच वयात ठरवायचे असते. जर आपली निवड चुकली तर आयुष्याचे गणित चुकते. दुर्दैवाने सध्याच्या तरुणाईवर राजकीय नेते आणि अभिनेत्यांचा प्रभाव अधिक असल्याचे जाणवतो.’’ श्रीमती रेडेकर, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांचीही भाषणे झाली.
‘सकाळ’-यिन मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षणमंत्री झालेला ज्ञानेश्‍वर शिंदे, विद्यापीठ स्तरावर यश मिळविलेली ग्रिष्मा भोवरे, भवम पिंपळे, मुझफ्फर मुल्ला, गोपाळ सरवळे, आयुष मंत्रालयातर्फे घेतलेल्या शॉर्ट व्हिडिओ स्पर्धेत प्रथम आलेल्या आयुर्वेदा इन माय डे या शॉर्ट फिल्ममधील कलाकारांसह वार्षिक क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्राचार्या डॉ. वीणा कंठी यांनी स्वागत केले. यावेळी प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी श्रद्धा बुधवंत, संस्थेच्या संचालिका डॉ. अरुणा रेडेकर-सावंत, उपप्राचार्य डॉ. पंकज विश्‍वकर्मा, डॉ. विराज शुक्ल, नर्सिंगचे प्राचार्य नवरत्न होसमनी, विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश काकडे आदी उपस्थित होते. डॉ. सुधीर येसणे यांनी सूत्रसंचालन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नैना विश्‍वकर्मा यांनी आभार मानले.