माहितीचे संकलन, पृथ:करण संख्याशास्त्रीय पद्धतीने करा; प्रा. डॉ. डी. एन काशिद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहितीचे संकलन, पृथ:करण संख्याशास्त्रीय पद्धतीने करा; प्रा. डॉ. डी. एन काशिद
माहितीचे संकलन, पृथ:करण संख्याशास्त्रीय पद्धतीने करा; प्रा. डॉ. डी. एन काशिद

माहितीचे संकलन, पृथ:करण संख्याशास्त्रीय पद्धतीने करा; प्रा. डॉ. डी. एन काशिद

sakal_logo
By

88804
आजरा : आजरा महाविद्यालयातील कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रा. डॉ. डी. एन. काशीद यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. एम. आर. ठोंबरे, डॉ. एस. टी. नाईक, डॉ. किरण पोतदार, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, योगेश पाटील, डॉ. अशोक दोरुगडे उपस्थित होते.

माहितीचे संकलन, पृथ:करण
संख्याशास्त्रीय पद्धतीने करा
प्रा. डॉ. डी. एन काशीद; आजरा महाविद्यालयात कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ : संशोधकांनी संख्याशास्त्रातील मूलभूत गोष्टींचा अभ्यास करून माहिती संकलनाच्या पद्धती व त्याचे पृथ:करण करण्याच्या पद्धती आत्मसात करा. त्या वेळीच संशोधन गुणवत्तापूर्ण होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. डी. एन. काशीद यांनी व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयात ‘डेटा अॅनेलेसीस फॉर रिसर्च’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्‍घा‍टनप्रसंगी काशीद बोलत होते. अग्रणी महाविद्यालय योजनेतून या कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय, शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज क्लस्टर अंतर्गत पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा झाली.
प्राचार्य डॉ. सादळे म्हणाले, ‘‘पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे व समाजोपयोगी संशोधन करावे.’’ संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरण पोतदार यांनी ‘टेस्टिंग ऑफ हायपॉथेसीस फॉर रिसर्च’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. अशोक दोरुगडे यांनी ‘डेटा अॅनेलेसीस युजिंग एमएस इक्सेल’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा. डॉ. एस. टी. नाईक, प्रा. ए. ए. गोटखिंडे, प्रा. शिवुडकर आदी उपस्थित होते. प्रा. वर्षा पाटील यांनी स्वागत केले. डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्राजक्ता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जयवंत पाटील यांनी आभार मानले.