राजाराम निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम निवडणूक
राजाराम निवडणूक

राजाराम निवडणूक

sakal_logo
By

राजाराम कारखान्यासाठी
२३ एप्रिलला मतदान
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः जिल्ह्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याचा बिगुल अखेर आज वाजला. कारखान्यासाठी २३ एप्रिलला मतदान आहे. त्यासाठी २० मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. मतमोजणी २५ एप्रिलला आहे. जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. राज्य सहकार प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.
कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २०२० मध्येच संपली; पण कोरोनामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या होत्या. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर गेल्या वर्षी या कारखान्याची निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाला. त्या वेळी प्रारूप यादीवरील घेतलेल्या हरकती, त्यावरील निर्णयाने हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला.
पूर्वी सुमारे एक हजार ४१५ सभासद अपात्र ठरविण्यात आले होते; पण सर्वोच्च न्यायालयाने ते सभासद पात्र की अपात्र याची फेरचौकशी करण्याचे आदेश देतानाच त्यांची मतदार यादीतील नावे कायम ठेवली. पुन्हा प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम झाला. त्यात या सभासदांवर केलेली हरकत प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी फेटाळून लावली. त्यामुळे यापैकी ९८५ सभासद पुन्हा पात्र ठरले. दरम्यान, कारखान्याची अंतिम मतदार यादी ९ मार्चला प्रसिद्ध झाली. त्याचदिवशी या निवडणुकीचा संभाव्य कार्यक्रम व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता.

दृष्टिक्षेपात कारखाना
स्थापना- १९३८, संचालक- २१
कार्यक्षेत्र- साडेसहा तालुके
कार्यक्षेत्रातील गावे- १२२
अ वर्ग सभासद- १३ हजार ४०९
ब वर्ग सभासद- १२९
एकूण- १३ हजार ५३८

निवडणूक कार्यक्रम असा ः
अर्ज भरण्याची मुदत- ता. २० ते २७
अर्जांची छाननी- ता. २८
अर्ज माघारीचा कालावधी- २९ मार्च ते १२ एप्रिल
मतदान- २३ एप्रिल
मतमोजणी- २५ एप्रिल