आमदार सतेज पाटील प्रश्न

आमदार सतेज पाटील प्रश्न

विधीमंडळातून ... लोगो

...

ऊसतोडणी यंत्रधारकांना
तातडीने अनुदान द्या

आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ ः राज्यात ऊसतोडणीसाठी मजुरांची कमी उपलब्धता आणि ऊसतोड मजुरांकडून वाहनधारकांची होणारी आर्थिक फसवणूक यावर पर्याय म्हणून ऊसतोडणीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने यंत्रधारकाना अनुदान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या ४० टक्के सहभागातून देण्यात येणारे हे अनुदान यंत्रधारकांना तातडीने द्यावे, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. या मागणीला उत्तर देताना राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीसाठी ऊसतोडणीधारकांना अनुदान देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली.
केंद्र सरकारने त्यांच्या हिश्श्याचा निधी मंजूर केला असला तरी राज्य शासनाने आपल्या हिश्श्याचा निधी जमा केलेला नाही. २०१८-१९ पासून प्रलंबित असलेले अनुदान देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून राज्यासाठी १९२ कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मंजूर केले आहे. याबाबत आमदार पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com