जुन्या पेन्शनसाठी खाजगी प्राथमिक शिक्षकही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या पेन्शनसाठी खाजगी प्राथमिक शिक्षकही
जुन्या पेन्शनसाठी खाजगी प्राथमिक शिक्षकही

जुन्या पेन्शनसाठी खाजगी प्राथमिक शिक्षकही

sakal_logo
By

संपात खासगी प्राथमिक शिक्षकही सहभागी

कोल्हापूर ः जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मंगळवार(ता.१४) पासून होणाऱ्या संपामध्ये खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक व कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली.संपकाळात शाळा बंद ठेवाव्यात व संस्थाप्रमुखांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात उतरत असल्याबद्दलचे पत्र त्वरित द्यावे. कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सकाळी अकरा वाजता टाऊन हॉल येथे उपस्थित रहावे. इतर तालुक्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी दररोज सकाळी अकरा वाजता प्रांत कार्यालयासमोर उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.