सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत उद्या बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत उद्या बैठक
सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत उद्या बैठक

सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत उद्या बैठक

sakal_logo
By

सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत उद्या बैठक
गडहिंग्लज : सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत व्यावसायिकांना माहिती देण्यासाठी नगरपरिषदेतर्फे बुधवारी (ता. १५) दुपारी साडेतीन वाजता बैठक आयोजित केली आहे. पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे. शहरात सिंगल युज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. परंतु प्लास्टिक वापरणाऱ्या अस्थापनाविरुद्ध कारवाईवेळी विनाकारण गर्दी करणे, दबावतंत्र आणणे, कारवाई पथकासोबत अनावश्यक वाद घालणे असे प्रकार होत आहेत. मात्र यापुढेही अशी कारवाई होतच राहणार आहे. अनेक अस्थापना अजूनही प्लास्टिक बंदीची माहिती नसल्याचे कारण सांगताहेत. यामुळे प्लास्टिक बंदीबाबत शासनाच्या आदेशाची माहिती देण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित केल्याचे खारगे यांनी सांगितले.