पाणी कनेक्शन खंडीत

पाणी कनेक्शन खंडीत

पाणीपट्टी विशेष वसुली धडक
मोहिमेत ४५ नळ कनेक्शन तोडली

थकबाकीदारांकडून ३४ लाख वसूल

कोल्हापूर, ता. १३ : शहर पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी वसुली धडक मोहिमेअंतर्गत रेल्वे विभाग, दोन हॉटेलसह ४५ नळ कनेक्शन तोडण्यात आली. तसेच थकबाकीपोटी ३४ लाख ५८ हजारांची रक्कम वसूल करण्यात आली.
पाच पथके स्थापन केली असून ए, बी, सी, डी, ई वॉर्ड अंतर्गत कारवाई केली जात आहे. ४५ कनेक्शन थकबाकीसाठी बंद करण्यात आली. आजअखेर विविध पेमेंट सुविधेद्वारे सुमारे १ लाख २० हजार लोकांनी १० कोटी ४८ लाख रक्कम भरणा केली आहे. स्पॉटबिल प्रणालीद्वारे सुमारे ११ हजार १७३ लोकांनी ३ कोटी ४३ लाख ७१ हजार रक्कम भरली आहे. विभागाच्या ७० कोटी उद्दिष्टापैकी ४५ कोटी म्हणजे ६५ टक्के वसुली झाली आहे.
वसुलीची कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, अमर बागल, संजय पाटील, मधुकर कदम, नरेंद्र प्रभावळकर, मीटर रीडर व सहाय्यकांनी भाग घेतला. मोहीम सुरू राहणार असल्याने खासगी तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयाकडील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. बिलाची थकीत रक्कम त्वरित भरून कारवाईचे प्रसंग टाळावेत, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com