केएमसीमध्ये कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमसीमध्ये कार्यशाळा
केएमसीमध्ये कार्यशाळा

केएमसीमध्ये कार्यशाळा

sakal_logo
By

केएमसी कॉलेजमध्ये संशोधन
प्रबंध लेखन कार्यशाळा

कोल्हापूर : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत ग्रंथालय विभागाच्यावतीने संशोधन प्रबंध लेखन विषयावर कार्यशाळा झाली. प्रमुख पाहुणे म्हणून कॉमर्स कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. टी. एल. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण पौडमल होते. प्रथम सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागातील डॉ. युवराज जाधव, तृतीय सत्रामध्ये न्यू कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. आर. पी. आडाव यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सचिन धुर्वे, प्रा. डॉ. बी. एम. पाटील, डॉ. प्रशांत नागावकर, प्रा.अनिल मुडे, विनायक मिस्री, प्रकाश टिपुगडे,अरुण शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रा. अंजली सूर्यवंशी, प्रा. संतोष पाटील, डॉ. युवराज मोठे, डॉ. जे. एम. शिवणकर, प्रा. ज्योती तरोडे, प्रा. प्रतिभा माळी, प्रा. संतोष झित्रे, प्रा. सारिका कांबळे, प्रा. रमेश राठोड आदी उपस्थित होते. अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.पी. डी. तोरस्कर यांनी स्वागत केले. ग्रंथपाल प्रा.रवींद्र मांगले यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अंजली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संजय कांबळे यांनी आभार मानले.