मराठी चित्रपट महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी चित्रपट महोत्सव
मराठी चित्रपट महोत्सव

मराठी चित्रपट महोत्सव

sakal_logo
By

88864
...

कलानगरी चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

चित्रपट, लघुपटांची मेजवाणी, उद्या पारितोषिक वितरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ ः येथील भगवान क्रिएशन्सतर्फे आजपासून कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. राजर्षी शाहू स्मारक भवनात सलग तीन दिवस महोत्सव रंगणार असून चित्रपट आणि लघुपटांची पर्वणी मिळणार आहे. दरम्यान, अभिनेते महादेव साळोखे, अभिनेत्री अंशुमाला पाटील, राजश्री पंडित, शिरीष राणे, अभय मोहिते, अतुल आतकरे, अश्विनी पाटील, प्रियांका रामगावडे, भारती आडूळकर, सुचित्रा मुंड्ये, तेजस्विनी मुंड्ये आदींच्या उपस्थितीत महोत्सवाचे उदघाटन झाले.
महोत्सवात उद्या (मंगळवारी) सकाळी नऊ ते रात्री नऊ यावेळेत विविध चित्रपट व लघुपट दाखवले जाणार आहेत. पश्चिम बंगाल, ओरिसा, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडूसह महाराष्ट्रातूनही लघुपट आले असून ते पाहण्यासाठी तरूणाईने गर्दी केली आहे. सर्वोत्कृष्ट लघुपट, चित्रपटांसह विविध गटातील नामांकने यापूर्वीच जाहीर झाली असून बुधवारी (ता.१५) सायंकाळी साडेसहाला पुरस्कार वितरण होणार आहे.