यशवंत पंचायतमध्ये जिल्‍हा परिषद प्रथम

यशवंत पंचायतमध्ये जिल्‍हा परिषद प्रथम

जिल्‍हा परिषद ...

‘यशवंत पंचायत’मध्ये जिल्‍हा परिषद प्रथम

पंचायत समिती गटामध्ये गडहिंग्लज द्वितीय

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १३ : यशवंत पंचायत राज अभियानात (२०२२-२३) कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा परिषदेने विविध विभागांकडील योजनांच्या स्वयंमूल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे विहीत नमुन्यात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्‍ताव सादर केला होता. या प्रस्‍तावाची सोमवारी (ता.१३) विभागीय आयुक्‍तांच्या समितीने छाननी केली. यात जिल्‍हा परिषद पहिली, तर पंचायत समिती गटात गडहिंग्‍लज दुसरी आली आहे.

विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार सातारा जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. घुले यांच्या समितीने कोल्‍हापूर जिल्हा परिषदेची २२ फेब्रुवारीला तपासणी केली होती. या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मनीषा देसाई-शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख व अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने हे यश संपादन केलेले आहे. आता राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी लवकरच राज्यस्तरीय समिती पडताळणी करणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडील प्रशासकीय कामकाज, सभा कामकाज, कर्मचारी सेवा, निलंबन निवृत्तिवेतन प्रकरणे, लोकायुक्त प्रकरणे आदी सर्व विभागांकडील केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा परिषदेकडील स्वनिधी आदी प्राप्त निधी व केलेला खर्च, अंगणवाडी कामकाज, लसीकरण, प्रसूती, जननी सुरक्षा योजना, पाणीपुरवठा योजना, बांधकामकडील पूर्ण-अपूर्ण कामे, घरकुल मंजुरी, हागणदारीमुक्त गावे, मनरेगा कामे, लेखाशीर्षची जमा-खर्च पत्रके, लेखापरीक्षण, शाळांमधील स्वच्छतागृहांची उपलब्धता, शाळा डिजिटल, पशू लसीकरण, कामधेनू योजना आदी कामकाजाची तपासणी करण्यात आली होती. पंचायत समितीने स्वयंमूल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साध्याच्या आधारे पंचायत समिती गटात गडहिंग्‍लजने प्रस्‍ताव सादर केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com