शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘राजर्षी शाहू परिषद’

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘राजर्षी शाहू परिषद’

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘राजर्षी शाहू परिषद’

कोल्हापूरः राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठ विविध उपक्रम राबवीत आहे. त्या अनुषंगाने विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्र आणि इतिहास अधिविभागातर्फे उद्या, बुधवारी आणि गुरूवारी (ता. १६) राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद होणार आहे. या परिषदेचे उदघाटन बुधवारी सकाळी साडेदहा वाजता मानव्यशास्त्र सभागृहात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे बीजभाषण होईल. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के असणार आहेत. या परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत अभ्यासकांना निमंत्रित केले आहे. त्यामध्ये डॉ. यशवंतराव थोरात, सदानंद मोरे, अशोक चौसाळकर, तारा भवाळकर, लक्ष्मीकांत देशमुख, प्राचार्य आनंद मेणसे यांचा समावेश आहे. या परिषदेला सर्व शाहूप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शाहू संशोधन केंद्राचे समन्वयक आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com