Thur, June 1, 2023

सावंत, ओतारी यांची निवड
सावंत, ओतारी यांची निवड
Published on : 14 March 2023, 12:00 pm
सावंत, ओतारी यांची निवड
आजरा : येथील जनता शिक्षण संस्था सेवकांची पतसंस्था आजराच्या अध्यक्षपदी संजय सावंत यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश ओतारी यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. थैल होते. संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. श्री. थैल यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. मनोजकुमार पाटील, नेहा पेडणेकर, वैजयंता अडकूरकर, विनायक चव्हाण, सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक विजय पोतदार यांनी आभार मानले.