
धरणग्रस्त आंदोलन
88870
....
पंधराव्या दिवशीही आंदोलन सुरूच
धरणग्रस्तांसोबत आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर, ता. १३ : धरणग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनानंतर उद्या (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाणार आहे. जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, बुधवारी (ता. १५) श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. धरणग्रस्त प्रत्येक वसाहतीमधील एका प्रकल्पग्रस्ताला उदर निर्वाहभत्ता व ६५ टक्के रकमेच्या व्याजाच्या निधीचे धनादेश त्यांच्या हस्ते व प्रकल्प अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.
...
मराठा महासंघातर्फे जेवणाची सोय
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे धरणग्रस्तांच्या दुपारच्या जेवणाची आज सोय करण्यात आली. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी धरणग्रस्तांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी धरणे बांधताना ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ असा आदेश काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत दानशूर लोकांनी धरणग्रस्तांच्या जेवण, नाश्त्याची यापुढे सोय करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी निवृत्त पोलिस उपअधीक्षक पी. जी. मांढरे, व्ही. के. पाटील, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, संजय कांबळे, प्रकाश पाटील, विजय पाटील, किशोर ढवंग, कृष्णा पाटील, मनोज जाधव, संयोगिता देसाई, राजू मालवेकर उपस्थित होते.