Wed, May 31, 2023

शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
Published on : 13 March 2023, 5:22 am
शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर
कोल्हापूर, ता. १३ : शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. रूईकर कॉलनीतील संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन झाल्यानंतर रक्तदान शिबिर झाले. छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकूण साठ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना ‘शिवचरित्रातील शंभूराजे’ पुस्तक भेट देण्यात आले. या वेळी साताप्पा कडव, योगेश रोकडे, संदीप पाडळकर, विशाल चव्हाण, सुनील यादव, अमोल पोवार, प्रवीण कुरणे, सागर साळोखे, सुजय भोसले, गणेश मांडवकर, सुधीर जितकर, मनीष बडदारे, तुकाराम खराडे, स्वप्नील पाटील, रूपेश जाधव, प्रशांत पाटील, प्रफुल्ल भालेकर, बंडू माळी, श्रीधर बावडेकर आदी उपस्थित होते.