शिवाजी पेठ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी पेठ आंदोलन
शिवाजी पेठ आंदोलन

शिवाजी पेठ आंदोलन

sakal_logo
By

शिवाजी पेठेत पुन्हा अधिकारी धारेवर
कोल्हापूर, ता. १३ ः आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे आज भागात पाहणीसाठी आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांसह अन्य कर्मचाऱ्यांना शिवाजी पेठेतील महिलांनी धारेवर धरले. पाहणीत जुनी वाहिनी तसेच पाण्याचा खजिनावरील पंप बदलल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे दिसली नाहीत. त्यामुळे या कामासाठीचा प्रस्ताव विभागाकडून तातडीने तयार केला जाणार आहे.
रविवारी रात्री शिवाजी पेठेतील महिला व नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराओ घातला. त्यावेळी आज पाणीपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शाखा अभियंता मिलिंद पाटील व मदन यादव यांनी भागात पाहणी केली. वेताळमाळ परिसर, राऊत गल्ली, इंगवले बोळ, सरदार तालीम, सरदार चौक या परिसरात पाहणी केल्यानंतर या अधिकाऱ्यांना महिलांनी पुन्हा धारेवर धरले. शाखा अभियंता पाटील यांनी भागातील वाहिनी जुनी असून, पाण्याच्या खजिन्यावर असलेला पंप जुना झाला आहे. तो पंप पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने पाण्याची समस्या येत असल्याचे सांगितले. काय दुरूस्ती करायचे, काय बदलायचे हे तुम्ही ठरवा. मात्र, आम्हाला दररोज सायंकाळी सात ते दहा वेळेत पूर्ण दाबाने पाणी मिळाले पाहिजे, असे महिलांनी सांगितले. त्यासाठी काय करायचे ते लवकर करा असेही सुनावले. त्यामुळे पाटील यांनी वाहिनी व पंप बदलण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करून दिला जाईल असे सांगितले. दरम्यान, आज भागात पाणी रविवारपेक्षा चांगल्या दाबाने आले.