
कर्मचारी संप
88908
कोल्हापूर : शासकीय निमशासकीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात संपाला प्रारंभ करताना विविध संघटनांचे कर्मचारी, प्रतिनिधी.
....
जिल्ह्यातील ८० हजार कर्मचारी संपावर
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी :४८ तासांच्या आत कामावर हजर रहाण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
कोल्हापूर, ता. १३ : ‘एकच मिशन-जुनी पेन्शन’ या मागणीसाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आज मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामध्ये ८० हजारहून अधिक कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून शासकीयसह आरोग्य विभागातील यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे. राज्य शासनाने जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, अशी वारंवार मागणी केली जात होती. मात्र, याकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा बेमुदत संप केला जात आहे. याला काँग्रेससह विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ४८ तासांच्या आत कामावर हजर रहा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.
....
महापालिका कर्मचारी संघाचा पाठींबा
कोल्हापूरः आंदोलनाला महापालिका कर्मचारी संघाने संपूर्ण पाठींबा दिला आहे. त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात महापालिकेचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कायम तसेच रोजंदारीवरील साडेतीन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याबाबतचे पत्र संघाने महापालिका प्रशासनाला दिले आहे. पाणीपुरवठा वितरण, अग्निशमन विभाग व आरोग्य सेवेतील कर्मचारी वगळून इतर सर्व आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाराही आहेत.
केएमटी सहभागी नाही
केएमटी कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार नसल्याने केएमटी सेवा सुरू राहणार असल्याचे मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले.
......
....
शासकीय तंत्रनिकेतनमधील कर्मचाऱ्यांची निदर्शने
जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी कृषी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतनमधील कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सायंकाळी पाच वाजता निदर्शने केली. कृषी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी कॅम्पसमधून मोटारसायकल रॅली काढून मुख्य प्रवेशद्वारात घोषणा दिल्या. शासकीय तंत्रनिकेतनमधील कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारात निदर्शने केली.