टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

88903
कोल्हापूर ः श्री. रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमालेतबोलताना प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील. शेजारी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. डॉ. रणधीर शिंदे.

जैन सांप्रदायाने मराठी साहित्य
समृद्ध केले ः गोमटेश्वर पाटील

कोल्हापूर, ता. १३ ः जैन सांप्रदायाने मराठी साहित्य समृद्ध केले आणि मराठी साहित्यात मोलाची भर घातली असे प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी सांगितल. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या श्री. रघुनाथ स्वामी आनंदमूर्ती व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘दोन हजार वर्षात शेकडो काव्यप्रकार जैन साहित्याने निर्माण केले. तसेच दक्षिणेतील, उत्तरेतील अनेक काव्यप्रकार मराठीत जैन कवींनी आणले. मराठी भाषेविषयी प्रेम जैन कवींनी आपल्या काव्यातून प्रकट केले आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे अध्यक्षीय मनोगतामध्ये म्हणाले, ‘जैन साहित्य हे वैविध्यपूर्ण असतानाही सर्वदूर का पोहोचले नाही, याचा विचार करायला हवा. आणि ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आर. बी. पाटील, प्रदीप पाटील, प्रा. प्रमोद दोशी, प्रा. दीपक भादले, प्रा. जयवंत दळवी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी मानले.