भाजप पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप पाणीपुरवठा
भाजप पाणीपुरवठा

भाजप पाणीपुरवठा

sakal_logo
By

पाणीपुरवठा विभागाची
तत्काळ माहिती द्या

राहुल चिकोडे यांचे प्रशासकांना निवेदन

कोल्हापूर, ता. १४ ः महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग शहराला पाणीपुरवठा करण्यामध्ये असफल झाला आहे. तसेच वारंवार गळती उद्‌भवत आहे. त्यासाठी वारंवार पाणी परिषद घ्या मागणी करूनही टाळाटाळ केली जात आहे. जनतेला पाणीपुरवठा विभागाची तत्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी प्रशासकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, नदीत मुबलक पाणी व मुबलक उपसा करूनही शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास विभाग अपुरा पडत आहे. पाणी परिषदेतून कामाची लक्तरे वेशीवर टांगली जातील या भीतीने महापालिका पाणी परिषद घेत नाही. आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून शहरासाठी किती पाणी उपसा केला जातो व त्यापैकी किती पाणी बिलामध्ये रूपांतर होते हे जनतेला जाहीर करणे आवश्यक आहे. उपसा व बिलामध्ये तफावत आहे. ती कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले हे जनतेला समजायला हवे. विभागाकडील क वर्ग मंजूर पदसंख्या १५१ असून, १०७ पदे रिक्त आहेत. वर्ग-४ च्या मंजूर २३२ पदांपैकी १५० पदे रिक्त आहेत. वर्ग १ व २ यांच्या मंजूर पदांपैकी सर्व १५ पदे रिक्त आहेत. जल अभियंतासारखे महत्त्वाचे पद असताना त्याची माहिती नसलेल्या व्यक्तीची नेमणूक केल्याने विभागाचा खेळखंडोबा सुरू आहे. या परिस्थितीत दुरुस्ती व कार्यवाही करण्यास असफल झाला आहात. थेट पाईपलाईन योजना केव्हा पूर्ण होणार त्याची तारीख जाहीर करू शकत नाही. तसेच ते पाणी काय दराने देणार? याचा विचार होणे जरुरीचे आहे.