बाळासाहेब मोरे हे समतेचे वाहक

बाळासाहेब मोरे हे समतेचे वाहक

gad146.jpg
89009
गडहिंग्लज : बाळासाहेब मोरे यांच्या गौरवप्रसंगी डॉ. संजय पंत बाळेकुंद्री, श्रीपतराव शिंदे, प्रताप कुलकर्णी, दत्तात्रय बरगे, स्वाती कोरी, विजय मोरे, सुरेश शिपूरकर आदी उपस्थिती होती.
--------------------------------------------------
बाळासाहेब मोरे हे समतेचे वाहक
श्रीपतराव शिंदे; गडहिंग्लज येथे मोरे यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : अलीकडे सर्वत्र जातवाल्यांची चलती आहे. त्याला खतपाणी घालून समतेचा आवाज दाबला जात आहे. तरीसुद्धा आयुष्यभर समतेचे वाहक म्हणून काम केलेल्या मोरे यांनी यापुढेही समाजात हा विचार अखंडपणे रुजवतील, असा विश्‍वास माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केला.
माजी उपनगराध्यक्ष व गोडसाखरचे माजी संचालक बाळासाहेब मोरे यांचा सहस्त्र चंद्रदर्शन गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. संजय पंत बाळेकुंद्री यांच्याहस्ते मोरे यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ देवून गौरव झाला. श्री. शिंदे म्हणाले, ‘स्वच्छ, निर्मळ आणि खाचगळगे भरत जाणाऱ्‍या पाण्यासारखे मोरेंचे जीवन आहे. पाण्याला जात-धर्म नसून ते समतेचे वाहक आहे. मोरे यांनीही आपले आयुष्य समाजाला समतेचे विचार देण्यात घालवले.’
डॉ. संजय पंत बाळेकुंद्री, सुरेश शिपूरकर, राजेंद्र गड्ड्यान्नावर, अनिता नाईक, सुनिल शेंडगे, गुरुनाथ मोरे, मीना रिंगणे, स्वप्नील मांडेकर, प्रताप कुलकर्णी यांची भाषणे झाली. सत्कार समितीच्या अध्यक्षा स्वाती कोरी यांनी स्वागत केले. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. राजश्री कोले यांनी मानपत्राचे वाचन केले. अजिंक्य मोरे यांनी आभार मानले. विजय मोरे, दत्तात्रय बरगे, प्रकाश मोरे, संजय रोटे, दत्तात्रय मोरे, विलास नाईक, आण्णासाहेब भोसले, प्रकाश रोटे, राजन जाधव, सागर पाटील आदी उपस्थित होते.

------------------------
* वाचन संस्कृतीला बळ
यावेळी बाळासाहेब मोरे यांची ग्रंथतुला झाली. यासाठी वापरलेले विविध ग्रंथ कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांना भेट देवून वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी प्रयत्न करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com