गुढीपाडव्यानिमित्त समर्थ मोटर्समध्ये सवलत योजना

गुढीपाडव्यानिमित्त समर्थ मोटर्समध्ये सवलत योजना

गुढी पाडव्यानिमित्त समर्थ
मोटर्समध्ये सवलत योजना
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : हिरो मोटोकॉर्प कंपनीचे येथील अधिकृत वितरक समर्थ मोटर्सने गुढी पाडव्यानिमित्त कोणत्याही दुचाकी खरेदीवर २१०० ते १० हजार रुपयांपर्यंतची सवलत योजना जाहीर केली आहे. गडहिंग्लज, आजरा व चंदगडमधील ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ मोटर्सचे संचालक अमरनाथ घुगरी व आलोक घुगरी यांनी केले आहे.
समर्थ मोटर्सतर्फे वारंवार ग्राहकांसाठी विविध सवलतीच्या योजना राबवण्यात येतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढी पाडव्याला नवीन वस्तू खरेदी आणि व्यवसायाचा प्रारंभ केला जातो. याच मुहूर्तावर समर्थ मोटर्सने ग्राहकांसाठी भरघोस सवलतीची योजना आणली आहे. रोख सवलतीसह गाडीला लागणारे अ‍ॅक्सेसरीजसुद्धा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. समर्थ मोटर्समध्ये १६ मार्चपर्यंत एक्स्चेंज व लोन मेळावा सुरू आहे. यामध्ये जुनी गाडी एक्स्चेंज करून नवीन गाडी घरी घेऊन जाण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे. तसेच सर्व्हिस कार्निव्हल १७ मार्चपर्यंत असून यामध्ये ग्राहकांना पेड सर्व्हिसिंगवर २५ टक्के सवलत, गुडलाईफ ग्राहकांसाठी ५ टक्के अधिक सवलत व बाईक केअर प्रॉडक्टवर २५ टक्केची सूट जाहीर केली आहे. समर्थ मोटर्समध्ये सर्व गाड्या हजर स्टॉकमध्ये उपलब्ध असून सर्व प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांनी शोरुमला भेट देऊन गाडी बुक करावी, असे आवाहनही केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com