Wed, June 7, 2023

रेडेकर रुग्णालयातर्फे रक्तदान शिबीर
रेडेकर रुग्णालयातर्फे रक्तदान शिबीर
Published on : 15 March 2023, 12:39 pm
रेडेकर रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिर
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातर्फे गोकुळ दूध संघाच्या लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील दूध शीतकरण केंद्रावर रक्तदान शिबिर झाले. कोल्हापूर येथील अर्पण ब्लड बँक व रेडेकर ब्लड स्टोरेज सेंटरच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात ६० बॅगा रक्त संकलन झाले. गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शशिकांत गायकवाड, प्रकाश पाटील, अश्रफ पेंढारी, अशोक मदकरी, महेश कोले, अनिल शिऊडकर, दीपक चौगुले, भाऊ पाटील यांच्यासह बाबासाहेब आढाव, रवींद्र पाटील, कल्याणी गोसावी, ज्योती पाटील, अमय पाटील, रामदास साळवी, संजय पवार आदी उपस्थित होते.