पत्रके एज्युकेशनल

पत्रके एज्युकेशनल

कर्तृत्ववान स्त्रियांमुळेच शिवरायांच्या
पश्चातही औरंगजेब अपयशी : डॉ. जाधव
कोल्हापूर : ‘‘छत्रपती शिवरायांच्या कालखंडात जिजाऊ मॉं साहेबांबरोबर अनेक कर्तृत्ववान स्त्रिया साक्षर, राजनीतिधुरंदर आणि रणनितीज्ज्ञ होत्या. त्यांच्या कर्तृत्वामुळेच शिवरायांच्या पश्‍चातही औरंगजेबाला मराठेशाहीची सत्ता संपवता आली नाही,’ असे मत डॉ. अर्चना जाधव यांनी व्यक्त केले. समिधा प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान झाले. जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक प्रियांका वाकळे अध्यक्षस्थानी होत्या.
जागृती समाज विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शारदा पाटील, ब्राह्मण सभा करवीरच्या संचालिका अनुराधा गोसावी यांचा ‘कर्तृत्ववान महिला’ म्हणून सन्मान करण्यात आला. आदिशक्ती महिला सहकारी औद्यगिक संस्थेचा प्रारंभही झाला. सायली मुनिश्वर यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगितली.
डॉ. जाधव, वाकळे यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. सौ. रावराणे, सौ. सरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. राधिका ठाणेकर यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. दीपा ठाणेकर, अमृता खाडे-पाटील, रामप्रसाद ठाणेकर, ओंकार गोसावी, शुभंकर गोसावी, ऋतुराज नढाळे यांनी नियोजन केले.
-
शाहू कॉलेजमधील ट्रेड फेअरला प्रतिसाद
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये वाणिज्य आणि आयक्यूएसीतर्फे ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने ट्रेड फेअर उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांमध्ये लस्सी, मसाले ताक, पाणीपुरी, बेळगावी आलेपाक, शाबू खिचडी आदी पदार्थ ठेवले होते. दैनंदिन वापरातील विविध वस्तूंची विक्री, आरोग्य तपासणी वगैरे ट्रेड फेअरच्या माध्यमातून घेण्यात आली. विद्यार्थी, प्राध्यापक, परिसरातील नागरिकांनी खरेदीचा आनंद घेतला. राजीव पारीख यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. श्री. पारीख म्हणाले, ‘कोणताही व्यवसाय करताना स्वतःमधील क्षमतांचा प्रभावी वापर करावा.’ महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन डॉ. एम. बी. शेख यांनी मार्गदर्शन केले. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी ट्रेड फेअरसाठी शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य विक्रांत पाटील उपस्थित होते. वाणिज्य विभागप्रमुख डॉ. संपदा लवेकर समन्वयक होत्या. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, उपप्राचार्या प्रा. डॉ. एस. जे. आवळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. शकील शेख यांनी मार्गदर्शन केले.
...
‘ओरिएंटल’ची एन.डी.ए., बी.ई.जी. ग्रुपला भेट
कोल्हापूर : राजारामपुरी टाकाळा येथील ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीज्‌ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी खडकवासला (पुणे) येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एन.डी.ए.) आणि खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये (बी.ई.जी.) शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. एन.डी.ए., बी.ई.जी. ग्रुपच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी संरक्षणाची विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये मॉर्निंग, रोप क्लायंबिंग, कवायत प्रकार, शूटिंग, जिम्नॅस्टिक, हॉर्स रायडिंग, युद्धामधील विविध रणगाड्यांची आणि लढाऊ विमानांची माहिती दिली. तसेच म्युझियमची माहिती दिली. लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सूर्यवंशी, स्कूलचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, सचिव प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
...
‘संत तुकारामांचा बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारावा’
कोल्हापूर : ‘बुडती हे जन न देखवे डोळा’, या संत तुकारामांच्या उक्तीचा अन्वयार्थ आजच्या काळाला लागू होतो. स्वतःची बुद्धी गहाण ठेवलेल्या शिक्षित आणि अशिक्षित माणसाने संत तुकारामांचा बुद्धिप्रामाण्यवाद स्वीकारला पाहिजे, तरच आपण आजच्या काळात टिकू शकतो, असे संत साहित्याचे अभ्यासक मारुती जाधव यांनी सांगितले.
ताराराणी विद्यापीठातर्फे ‘तुकाराम बीज’च्या निमित्ताने आयोजित व्याख्यान झाले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष अॅड. प्रकाश हिलगे उपस्थित होते. एस. डी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. एस. पी. पाटील यांनी आभार मानले.
...
89093
दिलीप नाटेकर अध्यक्षपदी
कोल्हापूर : कसबा बावडा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप नाटेकर, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग कांबळे यांची निवड झाली. पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया आणि सभापती, उपसभापती निवड प्रक्रिया सहाय्यक सहकारी अधिकारी श्री. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध झाली. संचालक म्हणून उमाजी उलपे, विष्णू पाटील, परशराम जांभळे, भीमराव पाटील, मनोहर पाटील, सुभाष जाधव, सर्जेराव काळे, राजू हजारे, मंगल चौगले, सिंधुताई गुरव यांची, तर महिला प्रतिनिधी म्हणून अनुराधा दशवंत यांची निवड झाली. ज्येष्ठ सभासद बबनराव दशवंत, मारुती गुरव, कर्मचारी अरुण चौगले, व्यवस्थापक वैशाली कदम, सरिता सावंत, गणेश भोसले, सभासद उपस्थित होते. ज्येष्ठ संस्थापक बाळासाहेब चौगले यांनी आभार मानले.
...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com